पुणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांसाठी सुरु असलेल्या योजना माहिती पत्रक
१. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य :- पुणे मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार करणेसाठी रक्कम रुपये १५०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
२. दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य :- दिव्यांग व्यक्तिंना समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणे अडचणीचे असल्यास तसेच त्यांनी शासनमान्य अधिकृत संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा संस्थेस जास्तीत जास्त रक्कम रु.१०,०००/- किंवा संस्थेची प्रशिक्षणासाठी असणारी फी या पैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षण खर्चापोटी देण्यात येईल.
३. दिव्यांग विद्यार्थ्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य जे दिव्यांग विद्यार्थी इ.१० वी व इ.१२ वी नंतर तांत्रिक, वैद्यकिय, इंजिनिअरींग, व्यवस्थापकीय, संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी किंवा विद्यापीठ मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सला प्रवेश घेतील अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत रु. २०,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल. तथापि ज्या संस्थेत प्रवेश घेतला असेल ती संस्था शासनमान्य असणे बंधनकारक राहिल.
४. अंध, विकलांग, मुकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेणेसाठी अर्थसहाय्य अंध, विकलांग, मुकबधिर व तत्सम दिव्यांग व्यक्तींना आपले दैनंदिन काम करताना उपयोगी पडणारे कृत्रिम साधनांसाठी रक्कम रु.२०,०००/- अर्थसहाय्य देण्यात येईल.
५. महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य:- १) पुणे महानगरपालिका परिसरात वास्तव्य असलेल्या किमान १५ मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करण्याकरिता
नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस प्रति मतिमंद व्यक्तीकरिता दरमहा रक्कम रु. २०००/- प्रमाणे र.रु. २४,०००/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येईल. अथवा २) महापालिका हद्दीतील वास्तव्य असणा-या मतिमंद व्यक्तीच्या पालकास आपल्या पाल्याच पालन-पोषण करण्याकरिता दरमहा रक्कम रु.२०००/- प्रमाणे एकूण र.रु. २४,०००/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करणेत येईल.
६. कुष्ठ पिडीत व १००% अतितीन दिव्यांग व्यक्तीकरिता वार्षिक अर्थसहाय्य महापालिका हद्दीतील कार्यात्मक / क्रियात्मक दिव्यांगत्व असलेल्या कुष्ठ पिडीत व १००% अतितीव्र दिव्यांग व्यक्तीस वार्षिक रक्कम रु. १२,०००/- अर्थसहाय्य देणेत येईल.”
७. दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य: पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या कमान ६०% किंवा त्यापेक्षा जास्त कार्यात्मक / क्रियात्मक दिव्यांगत्व (अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णबधीर (बहिरेपण व कमी ऐकू येणे), लोकोमोटर डिसअॅबिलिटी, ठेंगुपणा, इन्टेलेक्च्चुअल डिसअॅबिलिटी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डीस्ट्रोफी, दीर्घकालीन मज्जासंस्था विकार, विशिष्ट शैक्षणिक अपंगत्व, कुष्ठपिडीत, मल्टिपल स्केलेरोसिस, संभाषण व भाषा अपंगत्व, थैलासेमिया, हिमोफिलीया, सिकल सेल डिसीज, कर्णबधीर अंधत्व, यांसह विविध प्रकारचे अंधत्व, असिड हल्ला झालेली व्यक्ती, पार्किन्सन्स डिसीज) असलेल्या व्यक्तीस दरमहा रक्कम रु.२०००/- प्रमाणे वार्षिक रक्कम रू. २४,०००/- अर्थसहाय्य देणे.
८. दिव्यांग दिव्यांग, दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य: किमान ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास किंवा दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास विवाहासाठी र.रु. ३०,०००/- एकदाच अर्थसहाय्य देण्यात येईल.
९. दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्तीनी स्थापित केलेल्या कला पथकास र रु.५०,०००/- पर्यंत एकदाच अर्थसहाय्य देणे येईल.
१०. दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरु केलेल्या व्यवसायाच्या वृद्धी करिता अर्थसहाय्य देणे व्यवसाय वृद्धी होणे करिता भांडवली खर्चासाठी रक्कम रु.२५,०००/- पर्यंत अर्थसहाय्य देणेत येईल.
११. मोफत बस पास योजना पुणे मनपा हद्दीत राहणाऱ्या सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मोफत बसपास देणेत येत आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील परंतु पी. एम. पी. एम. एल. बस सेवेच्या क्षेत्रातील अंध व्यक्तींना मोफत बसपास सेवा देणेत येईल.
१२. दृष्टीहीनांसोबत मदतनीसाला पी. एम. पी. एम. एल. तिकिटात ५०% सवलत देणे पुणे शहर हद्दीतील व पी.एम.पी.एम.एल. बस जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत दृष्टीहीनांसोबत मदतनीसाला पी.एम.पी.एम.एल. तिकिटात ५०% सवलत देणेत येईल.
केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीकरीता असणाऱ्या योजना
१. निरामय – सदर योजना मतिमंद व्यक्तीकरिता असून (National Trust) मार्फत राबवली जाते. ह्यामध्ये मतिमंद व्यक्तीना २-१ लाखाचा विमा काढावा लागतो. सुरवातीला विमा काढताना रु. ५००/-व नंतर रु. २५०/- हा विमा हता असतो. दरवर्षी करावा लागतो. ह्यामध्ये बाह्य उपचार, नियमित वैद्यकीय तपासणी, दातांची शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियांचा समावेश होतो. तसेच वहातुकीचा खर्च देण्यात होतो. सुरवातीला सर्व वैद्यकीय खर्चाचे बिल आपणास अदा करावे लागते. सर्व बिले जमा करून शासनाकडे पाठवून आपल्यास रु. १ लाखा पर्यंतचा केलेला खर्च परत मिळतो.
२. मतिमंद मुलांचे पालकत्व मतिमंद मुलांच्या सरक्षणाकरीता त्यांचे
कायदेशीर पालक नेमण्याचा अधिकार त्यांच्या पालकाना आहे. त्यामध्ये प्रथम आई-वडील, भाऊ, बहीण व जवळचे नातेवाईक यांना कायदेशीर वारस म्हणून नेमण्याची तरतूद आहे. त्यामुळे पालकांच्या पश्चात संपत्तीचे वितरण करण्यास पालकांची मंजुरी घ्यावी लागते. साहजिकच मतिमंद व्यक्तींचे संरक्षण, संगोपन हित जपण्याची जबाबदारी कायदेशीर पालकांवर येते.
त्याकरिता www.thenationaltrust.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
महाराष्ट्र शासनाच्या योजना
१. शिष्यवृती शालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृती देण्यात येते. यामध्ये १ ली पासून इंजीनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती दिली जाते. इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत ऑफलाईन भरावा लागतो. तर ११ वी नंतर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
ऑनलाइन चा संकेत क्रमांक mahadbt.gov.in असा आहे.
२. प्रवास सवलत दिव्यांग व्यक्तीना एस टी किवा रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीटामध्ये ७५% सवलत देण्यात आली आहे. जर दिव्यांग व्यक्तीचे अपंगत्व ८०% असल्यास किवा जास्त असल्यास सोबतच्या व्यक्तीस ५०% तिकिटात सवलत मिळते.
३. संजय गांधी योजना दिव्यांग व्यक्तीना ज्यांचे उत्पन्न रु. २१,०००/- आत असल्यास महाराष्ट्र शासनाकडून रु. १५००/- द. म. पेन्शन मिळते.
४. ग्रामीण भागात रहात असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीना जिल्हा परिषदेमार्फत रु. ५००/- द.म. मिळतात. त्याकरिता त्यांच्या तालुक्यात फॉर्म भरावा लागतो.
५. दिव्यांग व्यक्तींचे वास्तव्य नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये असेल तर अशा दिव्यांग व्यक्तीना एकूण नगर पालिकेच्या व पंचायत समितीच्या उत्पनाच्या ५% दिव्यांगाना दिली जाते.
६. बीज भांडवल योजना दिव्यांग व्यक्तींना वयाच्या १८ व्या
वर्षानंतर व्यवसाय सुरु करायचा असल्यास त्यांना जवळच्या राष्ट्रीय कृत बँकेकडून रु.१,५०,०००/- (रु. एक लाख पन्नास हजारांपर्यंत) कर्ज मिळू शकते. त्यास शासनाकडून कर्जाच्या २०% सबसिडी दिली जाते
७. महाविद्यालयीन प्रवेश महाविद्यालयीन प्रवेशासाठी ४% जामा
दिव्यांग विद्यार्थ्यांना राखून ठेवलेल्या आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालय शिक्ष शिक्षण घेण्यासाठी मोफत वसतीगृहाची सोय केली आहे. तेथे राहून आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणे सुलभ होते.
८. नोकरी विषयक दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक पुनर्वसन व्हावे या
करीता शासनाच्या विभागात ४% जागा दिव्यांगाकरिता राखून ठेवलेल्या आहेत. तसेच समर्थन फॉर द डिसबल्ड पुणे ह्या सामाजिक संस्थेमार्फत (N. G. O) सर्व दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक क्षमतेनुसार दिव्यांगाकरिता वेळोवेळी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. सदर संस्था पुणे शहर किवा आसपासच्या विभागातील नामंकित कंपनीना आमंत्रित करून दिव्यांगाना नोकरी मिळवून देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.
९. व्यवसाय कर व उत्पनामध्ये विशेष सवलत दिव्यांग व्यक्तीना तसेच पालकांना नोकरीमध्ये व्यवसाय कर पूर्णपणे माफ केलेला आहे. तसेच त्यांच्या उत्प्नामध्येही विशेष सवलत देण्यात आलेली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना, शासकीय नोकरीमध्ये घराजवळ असणाऱ्या कार्यालयात नोकरी दिली जाते. घरापासून खूपच दूर असलेल्या कार्यालयात बदली करण्यात येत नाही.
१०. विवाह विषयक जर दिव्यांग व्यक्तीने सक्षम व्यक्तींशी विवाह केल्यास त्यास रु. २,५०,०००/- कौटुंबिक वस्तू व इतर खर्चासाठी देण्यात येतात. यामध्ये एकच व्यक्ति दिव्यांग असली पाहिजे. जर दोन्ही व्यक्ती दिव्यांग असल्यास त्यांना अनुदान मिळत नाही. सदर विवाह झाल्यावर योग्य कागदपत्रे देऊन एक वर्षाच्या आत जि.प. कडे अर्ज करावा लागतो.

श्रीराम सिद्धपाठकी
जीवनधारा विद्यालय
